सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्या बाई होळकर यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जेष्ठ नागरिक संघटना देऊळगाव राजा, जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची३०१वी जयंती विरंगुळा भवन येथे आज साजरी करण्यात आली , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.आशाताई कैलासराव शेळके होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ पुष्पाबाई गोविंदराव बोरकर , संघटना चे अध्यक्ष श्री.बळीराम मापारी, सचिव, गोविंदराव बोरकर होते.
सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्या बाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी प्रकाश अहिरे ,शांतिलालजी निरफळे, देविदास भालेराव,प्रा.विजयकुमार रायमल, बाबुलाल शिवरकर, बाबुराव नागरे, रमेश नरोडे, घनश्याम भंडारे, कैलास गाडगे, उपस्थित होते,यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली श्री.निरफळे काका,प्रा.विजयकुमार रायमल, बाबुराव नागरे सर, रमेश नरोडे सर सौ.शेळके मॅडम यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर विस्तृत भाषणे झाली,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गोविंद बोरकर यांनी केले.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे.



