ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंदनखेडा येथे आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

नेत्र तपासणीसह विविध आरोग्यसेवा : ग्रामीण नागरिकांना मिळाला लाभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे १८ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. सुनिम फाउंडेशन, अश्वघोष कला अकॅडमी फाउंडेशन, BAHO, मेत्तासेतू फाउंडेशन आणि श्रीवता एस. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात नागरिकांसाठी नेत्र तपासणी, सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी, वैद्यकीय सल्ला, हाडे व सांध्यांची तपासणी तसेच मानसिक आरोग्यविषयक समुपदेशन आणि मार्गदर्शन अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या परिसरातच आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात आणि आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

शिबिराच्या माध्यमातून नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व, आजारांचे वेळीच निदान आणि मानसिक आरोग्याची काळजी याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक स्वास्थ्यही महत्त्वाचे असून, निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी सर्वांगीण आरोग्याबाबत जागरूकता आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरला. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांसाठी कार्य करण्याची कटिबद्धता सहभागी संस्थांनी या माध्यमातून अधोरेखित केली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणारे वैद्यकीय तज्ज्ञ, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, सहकार्य करणाऱ्या संस्था आणि स्थानिक नागरिक यांचे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. अशा आरोग्य शिबिरांमुळे ग्रामीण भागात आरोग्यविषयक जनजागृती वाढण्यास आणि नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवांचा लाभ घेण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये