ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घातक ऑनलाइन संच मान्यता त्वरित दुरुस्त करा

राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त करणाऱ्या संच मान्यतेच्या "काळ्या ड्राप्ट"च्या निषेधार्थ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

  शिक्षण उपसंचालक कार्यालयावर शिक्षकांचे आंदोलन

        कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर शैक्षणिक सत्र 2025 -26 ची ऑनलाइन संच मान्यता नुकतीच कॉलेज लॉगिन ला टाकण्यात आलेली आहे ही संच मान्यता प्रचलित निकष डावलुन घातक निकषाच्या आधारे केली आहे त्यामुळे राज्यभरातील हजारो शिक्षक अतिरिक्त,अर्धवेळ,सी.एच.बी.झाले आहेत .अनेक क.म.वि.तथा तुकड्या अनुदानाकरिता अपात्र होतील अशी स्थिती आहे. दि. 28/5/2026 ला काॅलेज लाॅगिंला टाकलेल्या संच मान्यता.गेली वर्षभरात संचालक स्तरावर आँन लाईन संचमान्यते संदर्भात विज्युक्टा व महासंघ पदाधिकारी यांचे सोबत झालेल्या चर्चा व त्यासंदर्भात असलेले शासन आदेश,परिपत्रके संघटनेने दिली तरी सुध्दा या निकषाच्या आधारे ऑनलाइन संच मान्यता न झाल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचे विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी म्हटले आहे. या धोरणा विरुद्ध पुणे येथे आयोजित मोर्चाला प्रशासनाने ऐनवेळी अनुमती नाकारल्याने विज्युक्टा व राज्य महासंघाने शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर प्रचंड धरणे आंदोलन केले आंदोलनानंतर

 शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक तथा आम. सत्यजीतजी तांबे तसेच आम. जयंतजी आसगावकर महासंघ अध्यक्ष डॉ.संजयजी शिंदे, समन्वयक प्रा.मुकुंदजी आंधळकर व पदाधिकारी यांचे समवेत झालेल्या बैठकीत संचमान्यता ऑनलाईन करतांना प्रचलीत निकष लक्षात घेतले जातील याबाबत सहमती दर्शवली होती मात्र ते पाळले नसल्याचा आरोप डॉ. अशोक गव्हाणकर महासचिव विज्युक्टा यांनी केला आहे.

  प्रचलित निकषांना अनुलक्षुण ऑनलाइन संच मान्यता व्हाव्यात अन्यथा त्या विरुध्द राज्यभर प्रचंड आंदोलन घेतल्या जाईल. ऑनलाइन संच मान्यतेमध्ये तातडीने दुरुस्ती करावी यासाठी सोमवार दि. 1 जुन 2026 ला राज्यभर विभागिय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर “संच मान्यता काळा ड्राप्ट निषेध” आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.प्रविण चटप,सचिव प्रा.प्रमोद उरकुडे तथा जिल्हा व तालुका कार्यकारणी सदस्य यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये