घुग्घुस येथे बॅकवर्ड क्लास कोल एम्पलॉईज वेलफेअर असोसिएशनचे वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : येथील प्रयास सभागृहात मंगळवार, 26 मे रोजी सायंकाळी 5 वाजता बॅकवर्ड क्लास कोल एम्पलॉईज वेलफेअर असोसिएशन (वेकोलि नागपूर) चे पहिले वार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष गुलाब सिंह, महासचिव जयबहादूर यादव, सुदामा यादव, राकेश कडू, दीपक टिकले तसेच दीपक चटप उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी वक्त्यांनी सांगितले की, बॅकवर्ड क्लास कोल एम्पलॉईज वेलफेअर असोसिएशनची स्थापना ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि न्याय्य अधिकारांसाठी लढा देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून ओबीसी समाजाला नोकरीत 27 टक्के आरक्षण दिले जाते, मात्र पदोन्नतीमध्ये ही सुविधा दिली जात नाही. याच मागणीसाठी संघटना सातत्याने संघर्ष करत असून आता या आंदोलनाला गती मिळाली आहे. ओबीसी समाजाला त्यांचे हक्क मिळवून दिल्याशिवाय संघटना शांत बसणार नाही, असेही वक्त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे संचालन अजय पाटील यांनी केले.
यावेळी वणी क्षेत्र ओबीसी असोसिएशनचे अध्यक्ष संकेत खोकले, महामंत्री श्रीकांत सावे, घुग्घुस अध्यक्ष घनश्याम कुटेमाटे, सचिव तुलसीदास ढवस, मुंगोली अध्यक्ष सुधाकर आसुटकर, सचिव सुधीर पिंपळकर, नायगाव अध्यक्ष अक्षय धोबे, सचिव श्रीराम रोडे, निलजई अध्यक्ष अक्षय कौरासे, सचिव राजू कुचनकर, पैनगंगा अध्यक्ष राम यादव, दीपक काळे, सावन ठाकरे, संतोष धोबे, संजय ताजने यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.



