सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
स्वातंत्र्य, स्वाभिमान, आणि राष्ट्रभक्तीचा अखंड दीप प्रज्वलित करणारे क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रवादी साहित्यकार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती विरंगुळा भवन येथे आज दिनांक 28 मे रोजी साजरी करण्यात आली,
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जनसेवा सामाजिक संघटना, सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, व जेष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सतीश कुलकर्णी, अरुण खरात, विनायक देशपांडे होते,
सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा अशोक डोईफोडे, शांतीलाल निरफळे, प्रकाश अहिरे, रमेश नरोडे, सतीश कुलकर्णी, विनायक देशपांडे यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. केंद्र सरकारने स्वातंत्र्य वीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
कार्यक्रमात अरुण सपाटे, सूर्यभान पंडीत, मधुकरराव धुळे, घनश्याम भंडारी, मार्तंडराव घिके, रामदास कुलथे, बाबुलाल शिवरकर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश नरोडे यांनी केले.



