राजुरा येथे 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समारोह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत कार्यरत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र यांच्या वतीने दिनांक ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या महान स्त्रीशक्तीचे प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तेजस्वी नेतृत्व, न्यायप्रियता आणि सेवाभावी कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांचे विचारधन समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रशांत बोकारे हे राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून औदुंबर बाळासाहेब शिंदे पाटील उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्रीरामजी कावळे, डॉ. अनिल हिरेखन,डॉ. संजयजी गोरे, डॉ. संभाजी वरकड, डॉ. संदीपजी तुंडुरवार, पुंडलिक उराडे,तसेच प्रस्तावक गुरुदास कामडी उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समारोह निमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभही संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमास सर्व नागरिक, विद्यार्थी, शिक्षक व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यासन केंद्राच्या समन्वयक प्राध्यापक प्रा. सुषमा बनकर यांनी केले आहे.



