सिव्हील लाईन, वर्धा येथील स्विमींगपुल येथुन फिल्टर पाण्याची विद्युत मोटार चोरणारे आरोपी गजाआड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नमुद घटना ता. वेळी व स्थळी, यातील फिर्यादी हे नेहमी प्रमाणे ड्युटीवर गेले असता त्यांना स्टुल बॉक्सचे काम पडल्याने त्यांनी त्यांचे रूममध्ये जाऊन स्टूल बॉस्क पाहीला असता त्यांना स्टुलबॉक्स किंमत अंदाजे 2000/- रू. दिसला नाही. त्याचा शोध घेतला असता तो मीळून आला नाही. तसेच दिनांक 22/12/2024 रोजी सकाळी 06.30 वा. सुमारास फिर्यादी हे नेहमी प्रमाणे त्यांचे ड्यूटीवर स्विमींगपूल सिव्हील लाईन वर्धा येथे गेले असता, त्यांना त्यांनी दुरूस्तीकरीता खोलुन ठेवलेली एक 10 HP ची जुनी वापरती किर्लोस्कर कंपनीची फिल्टर मोटार किंमत अंदाजे 65,000/- रू. ची त्यांचे रूममध्ये दिसली नाही. आजुबाजुला शोध घेतला असता ति मिळुन आली नाही. वरील वर्णनाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरून नेला आहे. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अप. क्र. 2145/2024 कलम- 303 (2) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदरचा गुन्हा तपासावर असतांना मुखबीर कडुन मिळालेल्या खात्रीशीर खबरे वरून यातील अज्ञात आरोपी नामे 1) अश्वीनी राजु हराळे वय 24 वर्ष रा. वडर झोप्पड पट्टी आर्वीनाका वर्धा, 2) अरूणा रमेश सोळखे वय 20 वर्ष रा. वडर झोप्पड पट्टी, आर्वीनाका वर्धा. 3) राजेश प्रभाकर मानकर वय 32 वर्ष रा. गोंडप्लॉट वर्धा. यांना ताब्यात घेवुन पंचा समक्ष सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली 1) एक जुनी वापरती किर्लोस्कर कंपनीची 10 HP ची फिल्टर मोटार किंमत अंदाजे 65,000/- रू. 2) पाने पेन्वीस (टुलबॉक्स) किंमत अंदाजे 2000/- रू. असा एकुण जुमला किंमत 67000/- रू. याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरची विद्युत मोटार चोरल्याची कबुली दिल्याने तसेचे आरोपी क्र. 3) राजेश प्रभाकर मानकर वय 32 वर्ष रा. गॉडप्लॉट वर्धा. याने चोरीचा मुद्देमाल घेऊन जाण्याकरीता वापरण्यात आलेला ऑटो क्र. MH-31 CV-7415 किंमत 45,000/-रू असा एकुण जुमला किंमत 1,12,000/- रू. आरोपी अटक व जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदरचा माल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर तसेच पोलीस स्टेशन वर्धा शहरचे ठाणेदार पो.नि. पराग पोटे, स.पो.नी. विकास गायकवाड, यांचे निर्देशनानुसार पो.स्टे. वर्धा शहर येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो. हवा. राजेश राठोड ब.क्र.879, पो. अंमलदार सुरज जाधव ब.क्र. 1586, संभाजी मुंडकर ब.क्र.1649, अशफाक शेख ब.नं. 1600, मपो.शी. वर्षा राठोड ब.नं. 1762 चालक श्रेणी पो.उप.नी. मुंडे सा. यांनी केली आहे.