ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्ह्यात वर्धा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत मोठी कारवाई

देशी विदेशी व गावठी दारूचा 17 लाख 30 हजारांचा मुद्देमाल केला जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस अधीक्षक वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वर्धा जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशन ही विशेष मोहीम राबविण्यात आली असून दिनांक 16 मे 2026 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेदरम्यान ही मोहीम पार पडली. कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

या मोहिमेत वर्धा जिल्ह्यातील सर्व 19 पोलीस स्टेशन, विविध शाखा, पोलीस मुख्यालय व स्थानिक गुन्हे शाखेने सहभाग घेतला या मोहिमेदरम्यान अवैध दारू विक्री, अमली पदार्थ (NDPS), शरीराविरुद्ध गुन्हे,मालमत्ताविषयक गुन्हे तसेच आर्म्स ॶॅक्ट अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. एकूण 64 गुन्हे नोंदवून तब्बल 17 लाख 30 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे अवैध दारू विक्री: 204 आरोपींवर कारवाई करण्यात आली. 66 आरोपींकडून देशी-विदेशी दारू व गावठी मोहासह 64 गुन्हे नोंदवून 17,30,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.NDPS कारवाई: 45 आरोपींची तपासणी करण्यात आली. 35 आरोपी फरार असल्याचे आढळून आले असून एका आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.पाहिजे/फरार आरोपी: 7 पाहिजे आरोपी व 7 फरार आरोपींचा शोध घेण्यात आला.जुगार कारवाई: 38 आरोपींवर कारवाई करण्यात आली. 26 गुन्हेगार फरार मिळून आले तर 2 गुन्हेगारांविरुद्ध जुगार कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले.आर्म्स ॶॅक्ट: 18 आरोपींची तपासणी करण्यात आली. 10 गुन्हेगार फरार मिळाले असून एका आरोपीविरुद्ध हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.इतर कारवाया: कलम 55, 56 म.पो.का. अंतर्गत 44 इसमांची तपासणी करण्यात आली. तसेच MPDA अंतर्गत 17 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.या विशेष मोहिमेत एकूण 56 अधिकारी व 379 अंमलदारांनी सहभाग घेतला. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये