अवैद्य दारू वाहतुकीवर सावंगी मेघे पोलीसांची धडक कार्यवाही
एकूण २ लाख २८ हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पो स्टे सावंगी मेघे येथील पोलीसांची धडक कार्यवाही सावंगी (मेघे) पोलीस हे पो स्टे परीसरात पेट्रोलींग करीत असताना मुखवीरचे खात्रीशीर खबरेवरुन आरोपी नामे 1) आर्यन संदीप शंभरकर वय 19 वर्ष रा पालोती ता.जी., वर्धा आरोपी क्र 2) जितु मारोती गायकवाड वय 38 वर्ष रा.स्टेशनफैल ता.जी., वर्धा हे दोन्ही आरोपी हे आपले ताब्यातील मोटारसायकलने गावठी मोहा दारूचा माल घेवुन गावठी मोहा दारुची अवैध्यरित्या वाहतुक करणार आहे अशा प्राप्त खबरेवरुन दोन्ही नमुद आरोपीवर पंच व पो स्टॉफचे मदतीने सावंगी मेघे ते पालोती रोडवर स्कुल ऑफ स्कॉलरचे समोर नाकेबंदी करुन प्रो रेड केला असता नमुद दोन्ही आरोपीचे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती हीरवे रंगाची सुझुकी वर्गर्मेण दुचाकी गाडी क्र MH-32-AZ-1671 ची किंमत 120000/- रु 2) एका प्लॉस्टीकचे डबकीत अंदाजे 20 लीटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 200 रू प्रमाणे 4000/- रू चा माल असा एकुण जु.की 124000/- रु चा मुद्देमाल, 3) एक जुनी वापरती काळ्या रंगाचे टी.व्ही.एस रीडॉन दुचाकी क्र MH-32-AP-7066 ची किंमत 100000/- रू 4) एका प्लॉस्टीकचे डबकीत 20 लीटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 200 रु प्रमाणे 4000/- रू चा माल असा एकुण जु.की 104000/- रू चा मुद्देमाल असा एकुण 228000/-रु.चा मुद्देमाल मिळुन आल्याने मौका जप्ती पंचनामा कार्यवाही करून नमुद आरोपी 1) आर्यन संदीप शंभरकर वय 19 वर्ष रा पालोती ता.जी., वर्धा आरोपी क्र. 2) जितु मारोती गायकवाड वय 38 वर्ष रा. स्टेशनफैल ता.जी., वर्धा यांचे विरुध्द लेखी फिर्याद वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोहवा अभय खोब्रागडे ब.नं 274, पोशी शाम सलामे व.नं 1654, पोशी गौरव नरताम व न 681 सर्व नेमुणकीस पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली आहे.



