ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समुद्रपूर नगरपंचायतीमधील एका रिक्त पदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 वर्धा : नगरपंचायत समुद्रपूर प्रभाग क्रमांक 16 मधील एका रिक्त पदाचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

 नगरपंचायत समुद्रपूर मधील प्रभाग क्रमांक 16 येथील रिक्त एका जागेसाठी नामनिर्देशन पत्र नगरपंचायत कार्यालय समुद्रपूर येथे दिनांक 18 मे 2026 ते 25 मे 2026 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. दिनांक 23 व 24 मे 2026 रोजी ( शनिवार व रविवार) या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही. नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 26 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता पासून करण्यात येईल. वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 26 मे 2026 अशी आहे.

 उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख, उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख अपील नसेल तेथे दिनांक 27 मे 2026 ते 2 जून 2026 असा आहे. दिनांक 28 मे 2026 (गुरुवार), दिनांक 30 व 31 मे 2026 (शनिवार व रविवार) या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्रे मागे घेता येणार नाहीत. अपील असल्यास अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 कालावधीत. मात्र दिनांक 11 जून 2026 (गुरुवार) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत.

निवडणूक चिन्ह नेमून देण्याची तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख अपील नसेल तेथे दिनांक 2 जून 2026 (मंगळवार) रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. अपील असल्यास 11 जून 2026 (गुरुवार) रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. मतदान घेण्याची तारीख 20 जून 2026 (शनिवार) सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत अशी आहे. मतमोजणी व निकाल तहसील कार्यालय समुद्रपूर येथे 21 जून 2026 (रविवार) सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होईल. या पोटनिवडणुकीसाठी समुद्रपूरचे तहसीलदार कपिल हाटकर निवडणूक निर्णय अधिकारी असतील तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून समुद्रपूर नगरपंचायतच्या मुख्याधिकारी पौर्णिमा गावित काम पाहतील, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये