पोलीस-जनता संवाद व समन्वय बैठकीचे आयोजन
हाँटेल चालक मालक तसेच धार्मिक स्तळंविषयी जनता संवाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस व जनता यांच्यातील संबंध अधिक दृढ करणे, पोलीसांच्या कामकाजामध्ये जनतेचा सक्रिय सहभाग व प्रतिसाद वाढविणे तसेच आगामी सण-उत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जनतेचे सहकार्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने समाजातील विविध घटकांसोबत पोलीस-जनता संवाद व समन्वय बैठकीचे आयोजन दि. १६ ऑगस्ट २०२६ ते दि. २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत दि. १७.०८.२०२६ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये हॉटेल / लॉज / धाबे चालक मालक तसेच धार्मिक स्थळाचे विश्वस्त व सदस्य यांच्यासोबत पोलीस-जनता संवाद व समन्वय बैठका आयोजित करण्यात आल्या.
सदर बैठकांमध्ये पोलीस स्टेशन परिसरातील हॉटेल / लॉज / धाबे चालक-मालक यांच्या बैठकी घेऊन धाब्यासमोर रोड वर वाहने पार्किंग न करणे, ग्राहकांना दारू पिऊ न देणे, वेळेचे नियम पाळणे, कोणत्याही संशयित हालचाली आढळल्यास तात्काळ पोलीस ला माहिती देणे, पोलीस सोबत योग्य समन्वय ठेवणे इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. तसेच धार्मिक स्थळाचे विश्वस्त व सदस्य यांना मंदिराच्या सुरक्षा बाबत तसेच दानपेटी बाबत व मंदिराचे मुख्य द्वारा बाबत आणि सीसीटीव्ही बाबत मंदिराचे विश्वस्तांना सुरक्षे संबंधाने अवगत करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्याचे निराकरण करून याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित हॉटेल / लॉज धाबे चालक मालक तसेच धार्मिक स्थळाचे विश्वस्त व सदस्य यांनी स्थानिक पातळीवरील समस्या, सूचना व अपेक्षा पोलीस प्रशासनासमोर मांडल्या. पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या सूचनांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सदर संवाद बैठकीला जवळपास १००० प्रतिनिधी उपस्थित होते.
सुरक्षीत समाजासाठी पोलीस आणि जनता यांच्यातील परस्पर विश्वास, संवाद व सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे या भावनेतून सदर पोलीस-जनता संवाद उपक्रम राबविण्यात येत असून, आगामी काळातही विविध घटकांशी संवाद साधून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जनतेचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
सदरचे पोलीस जनता संवाद समन्वय बैठकांचे आयोजन हे मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शनात करण्यात आले.



