गोंडपिपरीतील जनता विद्यालय दहावीचा ९३.९१ टक्के निकाल
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ जनता विद्यालय गोंडपिपरी येथील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२६ चा निकाल उल्लेखनीय लागला असून विद्यालयाने ९३.९१ टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाच्या निकालामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा विद्यालयातून २३० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ३१ विद्यार्थी विशेष प्राविण्य, ६५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ९० विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर ३० विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणीत यश संपादन केले.
विद्यालयातील प्रयोशी एलुरे हिने ९३.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. समृद्धी भोयर हिने ९२.४० टक्के घेत द्वितीय क्रमांक मिळवला तर दिव्यांनी डोंगरे हिने ९०.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांच्या यशाबद्दल शिक्षक, पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभल्यामुळे विद्यालयाने समाधानकारक निकाल नोंदविला आहे.
निकाल जाहीर होताच विद्यालय परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विद्यालयाच्या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



