ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लबचा ‘बिझनेस लीडरशिप अवॉर्ड २०२६’ सोहळा ९ मे रोजी 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे ९ मे रोजी ‘बिझनेस लीडरशिप अवॉर्ड २०२६’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विदर्भातील उल्लेखनीय उद्योजकांना पुरस्कार देवून सन्मानीत केले जाणार आहे.

यावर्षी रोटेरियन डॉ. रेखा दांडेकर यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावणाऱ्या रवलीन खुराना, महेंद्र कुमार गुप्ता, मीनाक्षी एम. वाळके, पी. एस. अंबटकर, गौरव नागदेवते आणि दिलीप झाडे यांना ‘बिझनेस लीडरशिप अवॉर्ड’ देऊन सन्मानित केले जात आहे. हा पुरस्कार केवळ चंद्रपूरच्याच नव्हे, तर संपूर्ण विदर्भाच्या औद्योगिक विकासातील त्यांच्या योगदानाबद्दल विशेषतः दिला जातो. स्थानिक एनडी हॉटेल येथे सायंकाळी सहा वाजता आयोजित या सोहळ्यात जिल्हाधिकारी वासुमना पंत आणि व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रेमलाल पटेल यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान केले जातील.

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे समन्वयक मधुसूदन रुंगठा, प्रकल्प संचालक महेश उचके, अध्यक्ष संदीप रामटेके आणि सचिव राजेश गणारपरवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष संदिप रामटेके यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये