ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शास. औ. प्र. संस्थेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ११७ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिक्षालय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे प्राचार्य गजानन राजुरकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी रासेयो सल्लागार बी.आर.बोढेकर, कार्यक्रम अधिकारी राजू श्रीरामे, गटनिदेशक हितेश नंदेश्वर, जितेंद्र टोंगे,सहकार्यक्रम अधिकारी महेश नाडमवार, अनिता ढेंगेकर, स्टाफ क्लब चे सचिव एन.टी. गराड आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमानंतर स्टाफ क्लब द्वारा सेवानिवृत्त निमित्ताने अजय मार्तीवार यांचा सत्कार करण्यात आला.



