ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अभिषेक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिखली खुर्द येथे महाराष्ट्र दीन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- १ मे २०२६ रोज शुक्रवार ला अभिषेक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिखली (खुर्द)येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमा प्रसंगी शाळेचे शाळेचे संस्थापक, अध्यक्ष बी.एम.पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्याचबरोबर वर्ग ८,९, व ११ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटप करण्यात आल्या.

कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक ए. व्ही. गायकवाड व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी महाराष्ट्र दिना संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एल.गेडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन एस.एस राठोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी ते करिता शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये