महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा ; पोलिसांचा गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : वर्धा येथे महाराष्ट्र दिन उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. पोलिस अधीक्षक कार्यालयात सकाळी ८.३० वाजता माननीय पोलिस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.
यानंतर सकाळी ९.०० वाजता पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर राज्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी विविध पोलिस पथकांनी आकर्षक संचलन (परेड) सादर केले. पालकमंत्र्यांनी संचलनाची पाहणी करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
उपस्थितांना संबोधित करताना डॉ. पंकज भोयर यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविणे, शेतकरी कल्याण आणि पोलिस यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी वर्ष २०२५ साठी “पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह” जाहीर झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सन्मानितांमध्ये स.पो.नि. मंगेश भोयर (पोउ प नी ), अमोल लगड भारत पिसुडे (जाम ठाणे), हवालदार सतीश दरवरे , दिनेश बोथकर, सुनयना डोंगरे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— आशीष चिलांगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक
जनसंपर्क अधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय, वर्धा



