ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वंदे मातरम् चे सूर व मार्गदर्शक परिपत्रकानुसार महाराष्ट्र दिन साजरा

शासकीय, निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा महाविद्यालयात गुंजला जय जय महाराष्ट्र माझा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       तत्कालीन संयुक्त महाराष्ट्र चळवळ, संघर्ष व १०५ हुतात्म्यांचे बलिदान यातून १ मे १९६० रोजी मराठी भाषिकांचे राज्य अर्थात स्वतंत्र महाराष्ट्र राज्य उदयास आले.

मराठी अस्मिता, सांस्कृतिक वारसा, राज्याचा प्रगतीचा उत्सव म्हणून राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा केल्या जातो. तद्वतच श्रमिका प्रति कृतज्ञता म्हणून कामगार दिवस म्हणूनही या दिवसाला विशेष महत्व दिले जाते.

भद्रावती येथे पंचायत समिती, न्यायालय सह विविध जागी ध्वजारोहण पार पडले.

स्थानिक पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या हस्ते शासनाच्या मार्गदर्शक परिपत्रकानुसार शिस्तबद्ध ध्वजारोहण करून पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मानवंदना दिली.

तसेच स्थानिक नगर परिषद भद्रावती येथे नगराध्यक्ष प्रफुल चटकी व मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांचे प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले. तर तहसील कार्यालय येथे तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या हस्ते शासकीय मार्गदर्शक  परिपत्रकानुसार ध्वजारोहण सोहळा अतिशय शिस्तीत पार पडला.

यावेळी विशेष म्हणजे अपर जिल्हाधिकारी बालाजी कदम यांचे सह ठाणेदार योगेश्वर पारधी, नायब तहसीलदार व गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.

सर्वच जागी वंदे मातरम् या राष्ट्रीय गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ध्वजारोहण होताच राष्ट्रगीत होऊन जय जय महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये