ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलिस दलातील ०२ पोलिस अधिकारी ०४ अंमलदारांना मानाचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर

(पालक मंत्री श्री पंकज भोयर यांच्या हस्ते सत्कार)

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट सेवा आणि उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून दरवर्षी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. सन २०२५ या वर्षासाठी जाहीर झालेल्या या अत्यंत मानाच्या ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DGP Insignia) पदकांमध्ये वर्धा जिल्हा पोलीस दलातील ०२ पोलिस अधिकारी ०४ अंमलदारांनी आपले नाव कोरले आहे.

पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशानुसार, वर्धा जिल्ह्यातील खालील अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेचद्दल हे पदक देऊन गौरविण्यात आले आहे:

१. सपोनि श्री. मंगेश भोयर (पोलीस स्टेशन, तळेगाव)

२. उपनिरीक्षक श्री. अमोल लगड (वाहतूक शाखा, वर्धा)

३. सफी. श्री. भारत पिसुडे (जाम ट्रॅप, हायवे ट्रॅफिक)

४. पोहवा. श्री. दिनेश बोधकर (सायबर पोलीस स्टेशन)

५. सफी, श्री. सतीश दरवरे (पोलीस स्टेशन, देवळी)

६. मपोशि, सुनैना डोंगरे (पोलीस मुख्यालय, वर्धा)

या सर्व सन्मानार्थीनी त्यांच्या कार्यकाळात गुन्हे तपास, कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक व्यवस्थापन आणि क्लिष्ट तांत्रिक तपास क्षेत्र तसेच खेळाच्या क्षेत्रात अत्यंत उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक केले असून उद्या दिनांक ०१-०५-२०२६ ला सकाळी ४८.०० वा. मा. पालक मंत्री श्री पंकज भोयर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे

महाराष्ट्र पोलीस दलाच्या राजपत्रानुसार, राष्ट्रपती पदक प्राप्त तसेच विविध प्रवर्गात उत्तम कामगिरी करणाऱ्या या वीरांना हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येते. या गौरवमुळे वर्धा जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली असून इतर कर्मचाऱ्यांनाही यामुळे अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये