ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय येथे तुकडोजी महाराज जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक श्री विजय डाहुले, पर्यवेक्षिका माधुरी मस्की, एमसीवीसी विभाग प्रमुख प्रा आरजू आगलावे, समिती प्रमुख प्रा. नंदा भोयर उपस्थित होत्या.

सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,प्रिया दुर्गे व देवराव जाधव,तुकाराम धुर्वे यांनी तुकडोजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, कार्यक्रमाचे संचालन प्रा बाळू उमरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्वेतलाना टिपले यांनी मानले,या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये