ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते फिरत्या विक्री केंद्राचे लोकार्पण

उमेदच्या ७ प्रभाग संघाना विक्री केंद्राचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत समुहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला ग्रामीण भागात तसेच तालुक्यात मोक्याच्या ठिकाणी बाजारपेठ मिळावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेतून ७० लक्ष रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या वर्धिनी फिरते विक्री केंद्राचे लोकार्पण व वितरण पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या फिरते विक्री केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मयी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल. ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उमेदचे अभियान व्यवस्थापन निरज नखाते, प्रभाग संघाच्या महिला उपस्थित होत्या.

उमेदच्यावतीने जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेतून ७० लक्ष रुपये खर्च करुन चारचाकी मालवाहनाचा उपयोग करुन ७ फिरते विक्री केंद्र तयार करण्यात आले. या फिरते विक्री केंद्रावर स्वयंसहाय्यता समुहाने उत्पादित केलेल्या वस्तूची विक्री शहर व ग्रामीण भागातील मोक्याच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. सदर विक्री केंद्राचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते प्रभाग संघाना हस्तांतरण करण्यात आले.

*महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळेल – पालकमंत्री*

फिरत्या विक्री केंद्रामुळे महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळेल आणि त्यांना अधिक जोमाने काम करण्याची उर्जा मिळेल, असे यावेळी बोलतांना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांनी केले. लोकार्पणानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वाहने प्रभागसंघांना सुपुर्द व प्रभाग संघाच्या ठिकाणी रवाना करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये