ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरीत्या गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्यावर सावंगी मेघे पोलीसांची अटकेची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 29.04.2026 रोजी पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील पोलीस स्टाफ सिखबेडा ते पालोती रोडने पेट्रोलींग करीत असताना एक ईसम त्याचे मोटरसायकलवर चार प्लास्टीक डबकीमध्ये गावठी मोहा दारू बरून दारूची वाहतूक करताना पंचासमक्ष मिळून आल्याने त्याचे ताब्यातून 1) एक हिरो कंपनीची मोटरसायकल क. एम.एच 32 यू 3691 किं. 25,000/रू. 2) चार प्लास्टीक डबकीमध्ये प्रती डबकी 20 लि. प्रमाणे एकुण 80 लि. गावठी मोहा दारू, 16.800/रू. असा एकुण जु.किं. 41,800/रू चा माल अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्याने सदरचा माल मोक्का जप्ती पंचनामा कारवाई प्रमाणे जप्त करून आरोपी विरुध्द अप.क. 368/2026 कलम कलम 65 (अ) (ई), म.दा.का. सहकलम 3(1) 181, 130/177 मोवाका, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज वाघोडे सा, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे व पोलीस स्टाफ पोलीस हेड कॉन्स्टेबल विरेंद्र कांबळे, संजय पंचभाई, अनिल वैद्य, हर्षवर्धन मून, निखील फुटाणे, अमोल जाधव यांनी केली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई हे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये