ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून सभेला बोलवलेल्या आदिवासीचा अवमान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

        चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा उप विभागामध्ये कुसुंबी येथील आदिवासी कोलाम समाजाच्या शेतकऱ्यांनी दि १३ एप्रील ला उप विभागिय अधिकारी रविन्द्र माने यांच्या समक्ष कॅबिन मध्ये विष प्राशन करून संपूर्ण राज्यात खडबड माजवून दिली जिल्हा रुग्णालयात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक उईके जिल्हाधिकारी वसुमन पंत पोलीस अधीक्षक ममुका सुदर्शन मुख्य कार्यपालन अधिकारी कलपित सिंह यांनी भेट देऊन विष प्राशनकेलेल्या आदिवासीना समज देऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास दिला होता त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी वसुमन पंत यांनी महसूल विभाग भूमि अभिलेख विभाग वन विभाग व पोलीस विभाग यांच्यासह सकाळी दहा वाजता वीस कलमी सभागृहामध्ये मीटिंग चे आयोजन जिल्हाधिकारी यांनी केले होते मिटींगचे आयोजनाकरिता महसूल विभागाच्या जमीन विभागाकडून कालच शेतकऱ्याचे प्रतिनिधी आबिद अली व इतर विभागांना सूचना देऊन बोलण्यात आले.

त्यानुसार प्रकल्प बाधित आदिवासी भावराव कन्ना के केशव कुडमेथे सुनिल पेंदोर भिमा मडावी या शेतकऱ्यासह सकाळी दहा वाजता आबिद अली दहा वाजता सभेसाठी हजर झाले सभागृहामध्ये गेले असता कंपनीच्या लोकांना घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार व उपविभागीय अधिकारी रवींद्र माने हॉल मध्ये बसले होते तेव्हा आदिवासी गेले असता आमची दुसरी मीटिंग सुरू आहे तुम्ही बाहेर थांबा म्हणून बाहेर जाण्यास सांगितले नंतर पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी रविन्द्र जाधव यांनी आदिवासी शेतकरी व आबिद अली यांना आत बोलवले असता आत जाताच निवासी उपजिल्हाधिकारी यांनी तुम्हाला कोणी बोलावले बाहेर निघा म्हणून जोराने जोराने आवाज काढून धमकवण्याचा प्रयत्न करत होतेआम्हाला बाहेर जाण्यासाठी अपमानीत व एककली भुमिकेत बोलत असताना आपण नोटीस देऊन आम्हाला बोलावलं आहे का मग बाहेर जाण्यासाठी का सांगता असे म्हणताच दगडू कुंभार हे अवमान करणारा भाषेत आदिवासींनाजोरात जोराने बोलत असताना आदिवासी बाहेर निघून गेले.

जिल्हाधिकारी मॅडम सभागृहात येतात निवासी उपजिल्हाधिकारी यांनी या भाषेत अपमान केला या भाषेचा आदिवासींनी निषेध करून जिल्हाधिकारी मॅडम यांनी आदिवासी बाजू ऐकूण प्रश्न मागणी गांभीर्याने घेत वातावरण शांत केले एक लोकसेवक अरेरावीची भाषा एखाद्या कंपनीकडे झुकते माप देऊन दुसऱ्यांना अवमान करणे तसेच राजूराचे उपविभागीय अधिकारी शासनाचा बंगला राजुरा येथे असताना गेले अडीच वर्ष माणिकगड सिमेंट कंपनीच्या रेस्ट हाऊस मध्ये राहून विभागाचा कार्य सांभाळले यांच्यामुळे आदिवासीना न्याय मिळेल ही आशा घुसर झाली आदिवासी ची अडवणूक व दुर्लक्षधोरणामुळे दिलेल शेकडो अर्ज केराच्या टोपलीत टाकल्याने भावना दुखाविल्या मुळे व आमची समस्या ऐकूण घेत नसल्याने निराषेपोटी टोकेची भूमिका घेत ५ आदिवासीनी विष घेण्याची पाळी ओढावली या शब्दात आदिवासींनी आपली भावना व्यक्त केली.

मात्र जिल्हाधिकारी यांनी आदिवासींची बाजू समजून घेत पुढील 30 दिवसात नोकारी कुसुंबी बॉम्बेझरी येथील मोजणी व मंडळ अधिकारी तलाठी पोलीस यांच्या समक्ष बाम्बेझरी येथील सर्वे नंबर 44 45 46 47 48 या जमिनीची मोक्का पंचनामा करण्याचे निर्देश दिले जनतेशी अवमान करणारी वागणूक व अरेरावी दगडू कुंभार सारख्या अधिकाऱ्याकडून सामान्य नागरिकांना अपेक्षित नाही मात्र यांची वागणूक ही जनसामान्यांना अवमान करण्याचे असल्याने निषिध व्यक्त करण्यात येत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये