ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर येथे ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस व विरोधकांविरुद्ध गडचांदूर येथे महिला आक्रोश मोर्चा

"महिला आरक्षणाचे मारेकरी काँग्रेस" - भाजप महिला मोर्चाचा हल्लाबोल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

      केंद्र सरकारने आणलेल्या ऐतिहासिक *‘नारी शक्ती वंदन अधिनियम – 33% महिला आरक्षण’* विधेयकाला काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी संसदेत व बाहेर विरोध केल्याच्या निषेधार्थ आज *दि. 29 एप्रिल 2026 रोजी* गडचांदूर शहरात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

शेकडो महिलांनी हातात फलक व मशाल घेऊन, काळे झेंडे दाखवून संविधान चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत मोर्चा काढला. *”महिला आरक्षणाचे मारेकरी काँग्रेसचा निषेध असो”, “नारी शक्ती वंदन विधेयकाचे स्वागत”, “मोदी है तो मुमकिन है”*, महिलाओके सन्मान मे भाजपा मैदान मे “सशक्त नारी सशक्त भारत ” महिलांच्या अधिकारावर वार कांग्रेस आहे जिम्मेदार” कांग्रेस द्वारा नारी शक्ती का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान ” अशा घोषणा देत काँग्रेसचा तीव्र निषेध करण्यात आला.

*महिला मोर्चाचा आरोप काय?*

भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री कुमारी अल्का आत्राम म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोडो माता-भगिनींना राजकीय ताकद देण्यासाठी *लोकसभा व विधानसभेत 33% आरक्षण* देणारे ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक आणले. *हे विधेयक 20 सप्टेंबर 2023 रोजी लोकसभेत 454 विरुद्ध 2 मतांनी मंजूर झाले.*

पण *काँग्रेस पक्षाने व त्यांच्या मित्रपक्षांनी वर्षानुवर्षे फक्त आश्वासनं दिली. सत्तेत असताना हे विधेयक आणले नाही. उलट आता मोदींनी आणल्यावर त्याला वेगवेगळ्या कारणांनी विरोध करत आहेत.* OBC आरक्षणाचे कारण पुढे करून, जनगणनेचे कारण सांगून विधेयक लांबवण्याचा डाव काँग्रेस करत आहे. *हा महिलांचा सरळ सरळ विश्वासघात आहे.”

यावेळी प्रदेश महामंत्री कुमारी अल्का ताई आत्राम, महिला प्रदेश सचिब सौं रेणुका दुबे, जिल्हा महिला मौर्च्या अध्यक्षा सौं वंदना ताई शेंडे, जिल्हा महामंत्री सौं विजयालक्ष्मी डोहे,जिल्हा अनुसूचित आघाडी अध्यक्षा सौं रंजमा ताई मडावी,तालुका महामंत्री ऍड दिपांजली मंथनवार, गडचांदूर शहर अध्यक्षा सौं शितल धोटे,सौं उमाताई कंटाळे, नगरसेविका कीर्ती वैरागडे, मगरसेविका सौं संगीता गाऊत्रे, कोषाध्यक्षा सौं अपर्णा ताई उपलेंचिवार,नगरसेविकां सौं सपना शेलोकर,

गोंडपिपरी शहर अध्यक्षा ऍड.सौं अरुणा जाभुळकर, सौं कोमल फरकाळे,सौं अरुणा बेतावार,सौं तेजस्विनी झाडे,सौं पौर्णिमा आवाळे, सौं त्रिवेना जगताप, सौं सिंधू कापसे, सौं इंदुताई कोरे, सौं पायल येलमुळे, सौं मनीषा भालेराव, सौं शारदा फुसाटे, सौं चंदा बुराटकर, सौं मायाताई बावनवाडे, सौं जयश्री येरेकर, सौं मीनाली सोनटक्के, सौं भारती गोखरे, सौं सारिका नामवाड, सौं प्रीती सातपाडी, साय सारिका पिंपळकर, सौं लताताई दरेकर, सौं मनीषा भालेराव व असंख्ये महिला उपस्थित होत्या

प्रदेश कार्यकारनी सदस्य महेश शर्मा,शहर अध्यक्ष,अरविंद डोहे, तालुका महामंत्री सतीश उप्लेंचिवार, तालुका अध्यक्ष संजय मुसळे,शहर महामंत्री हरीश घोरे,युवा अध्यक्ष विकी उरकुडे,महामंत्री तथा नगरसेवक सतीश बेतावार,नगरसेवक हिमांशू नामवाड, सुरेश मेश्रान,सुरज पांडे,महामंत्री महेश घरोटे, उपाध्यक्ष अरविंद कोरे,युवा जिल्हा उपाधाक्ष आशिष ताजने,व्यापारी अध्यक्ष विश्वाभर झाम,चिटणीस रमेश चुदारी, देवराव विधाते,शंकर आपुरकर,जयंता भोंगळे,देविदास पेंदोर,सचिन माली,साकीर भाई, जगन कापसे,गणपत बुरटकार, योगेश बांदुरकर,गणेश आदे, हरीश कुसले, मनोहर झाडे, संजय नीत,आदी शकडो महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये