दिवं. डॉ. शिवनाथजी कुंभारे यांचे स्मरणार्थ 30 एप्रिल रोजी जनश्रद्धांजली सभेचे आयोजन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
येथील थोर समाजसेवी व्यक्तिमत्व, विविध सामाजिक व धार्मिक, सांस्कृतिक संस्थाचे मार्गदर्शक, अ. भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे माजी जिल्हा सेवाधिकारी डॉ. शिवनाथजी कुंभारे (गडचिरोली) यांचे काल गडचिरोली येथे निवासस्थानी निधन झाले आणि त्यांचेवर कठाणी नदी घाटावरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जिल्हातील श्रीगुरुदेव सेवा मंडळ सर्व शाखा, राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती, गडचिरोली सायकल स्नेही मंडळ, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती, झाडीबोली साहित्य मंडळ, गडचिरोली जिल्हा दारूबंदी समिती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती आदी कार्याशी ते जुळलेले होते.
दिवंगत डॉ. कुंभारे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ३० एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता श्री गुरुदेव सेवा मंडळ मुख्य शाखेत जन श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी जनतेनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन जिल्हा सेवाधिकारी अरविंद पाटील वासेकर यांनी केले आहे.



