कुनाडा गावामागे ३२ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ तालुक्यातील पुनर्वसित कुनाडा गावाच्या मागील बाजूस ३२ वर्षीय युवकाचा मृतदेह सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत युवकाचे नाव सुनील कुमरे (वय ३२) रा. विजासन, भद्रावती असे आहे. कुनाडा गावातील काही नागरिक परिसरात फिरत असताना त्यांना एका अनोळखी इसमाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान मृतदेहाची ओळख सुनील कुमरे अशी पटली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
नेमका मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सत्य समोर येणार आहे. मात्र, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.



