ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाकरूणीक तथागत गौतम बुद्ध जयंती निमीत्त बुद्धपहाट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           ऐतिहासिक विज्जासान बुद्ध लेणी, विज्जासान, भद्रावती येथे वैशाख पौर्णिमेच्या पावन पर्वावर महाकारुणिक तथागत बुद्ध जयंती निमित्य बुद्ध पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक ३० एप्रिल २०२६ रोज गुरुवारला सायंकाळी ६.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ते विजासन बुद्धलेणी पर्यंत भव्य धम्म शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दिनांक ०१ मे २०२६ रोज शुक्रवार ला पहाटे ५.०० वाजता हजारो बौद्ध उपासक उपासिकांच्या उपस्थितीत त्रिशरण व पंचशील ग्रहण करून पूज्य भंते विरिय पाण्यो, यांच्या सुमधुर वाणीतून बुद्ध वंदना तसेच धम्मदेसना चे आयोजन करण्यात आले आहे.

तथागतांच्या जयंती प्रसंगी होऊ घातलेल्या मंगलमय कार्यक्रमात सहपरिवार उपस्थित राहून, त्रिषरण व पंचशील ग्रहण करून होणाऱ्या धम्मादेसनेचा सर्व भद्रावतीकरणी लाभ घावा असे आवाहन डॉ. बी आर आंबेडकर यूथ क्लब तर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये