गो मातेला राष्ट्रमाता घोषित करा _ संत मुर्लिधर महाराज
तहसीलदार, ठाणेदार यांना निवेदन ; सावली शहरात गो सन्मान रॅली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
२७ एप्रिल ते २७ जुलाई या कालावधीत गो- सन्मान दिवस म्हणून देशभर,’गो सन्मान अभिमानाला” सुरुवात करण्यात आली त्याचाच एक भाग म्हणून संत मुर्लिधर महाराज यांच्या नेतृत्वाखाली गो मातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करा,या जयघोषात नुकतेच तहसीलदार, ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुक्यातील हिरापुर, कवठी,पारडी,रुद्रापुर,चांदापुर,बोथली,साखरी,सिर्सी,हरांबा,चांदापुर,उसेगाव,भट्टेजांब,केशरवाही,चकपिरंजी, किसाननगर,पेंढारी, सह सावली शहरा आणि तालुक्यातील अनेक गोप्रेमी बांधवांची उपस्थिति होती
विशेष म्हणजे सर्वत्र गो वंश तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे,त्यांची हत्या थांबवावी, तसेच गो माता ही मातेसमान समान आहे,तिचे रक्षण करुन तिला राष्टमातेचा दर्जा देण्यात यावा, यासाठी आज सोमवार (२७ ) ला संत मुर्लिधर महाराज यांच्या नेतृत्वाखाली सावली मुख्यालयातून गो प्रेमी बांधवांच्या उपस्थितित गो मातेची रैली काढून निवेदन देण्यात आले.
राज्यात तसेच ग्रामीण भागात गोसंवर्धन आणि गोसंरक्षणाच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “गो सन्मान आव्हान अभियान” या उपक्रमाला सर्वत्र सुरुवात झाली ,गोरक्षण, गो-सेवा आणि गो-मातेचा सन्मान यासाठी समाजातील विविध घटक एकत्र येत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
अभियाना मागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे गोवंशाचे संरक्षण, भटक्या जनावरांच्या समस्येवर उपाययोजना, शेतकऱ्यांना आधार आणि गोसंवर्धनाबाबत जनजागृती करणे हा आहे,पशुवैद्यकीय शिबिरे आणि गोदुग्ध उत्पादने प्रोत्साहन यावर विशेष भर दिला जात आहे.
गो मातेची सेवा हीच खरी मानवसेवा” या संदेशाने प्रेरित होऊन समाजातील सर्व स्तरातून या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला,या अभियानात अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या सदस्याची उपस्थिती दिसुन आली अभियानाच्या यशश्वीतेसाठी तालुक्यातील मोठ्या प्रमानात गोप्रेमी बांधव,भगिनी यांची उपस्थित होती.
गाय ही भारतीय संस्कृती श्रद्धा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गोमातेचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कृतीचा सन्मान होय. ज्या समाजात गोसेवा आणि गोसंरक्षणाला महत्त्व दिले जाते, तो समाज नैतिक, आर्थिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध होतो. म्हणून
प्रत्येकाने गोसंवर्धन हे आपले कर्तव्य समजून गोमातेच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा ….
संत मुर्लिधर महाराज



