अंमली पदार्थाची विक्री, वाहतुक आणि साठवणुक करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची करण्यात आली कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
राकेश उर्फ भुन्या सिद्धार्थ जनबंधु, रा. टाका ग्राऊंड हिंगणघाट याचेवर पोलीस ठाणे हिंगणघाट येथे अंमली पदार्थ विक्री, वाहतुक आणि साठवणुक संबंधाने एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अन्वये ७ गुन्हे दाखल असुन, त्याचेवर वेळोवेळी प्रचलित कायद्यान्वये प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले होते. परंतु त्याच्या अंमली पदार्थ विक्री, वाहतुक व साठवणुक करण्याच्या प्रवृत्तीमध्ये सुधारणा होत नव्हती.
राकेश जनबंधु याने भूतकाळात केलेले गुन्हे, गुन्हा केल्यानंतर गुन्ह्यातुन पुन्हा जामिनावर मुक्त होण्याची शक्यता, भविष्यातही त्याची प्रतिबंधित मनः प्रभावी अंमली पदार्थांचा ताबा बाळगणे, त्यांची वाहतूक करणे व विक्री करणे अशा समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी होण्याची पूर्ण शक्यता विचारात घेता, मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शनात राकेश उर्फ भुन्या सिद्धार्थ जनबंधु, रा. टाका ग्राऊंड हिंगणघाट याचा PITNDPS अधिनियम, १९८८ चे कायद्या अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
स्थानबद्धता प्राधिकारी तथा प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग, महाराष्ट्र शासन, यांनी PITNDPS च्या कायद्यानुसार राकेश जनबंधु याचे स्थानबद्धतेचा आदेश दिनांक ०५/०८/२०२६ रोजी निर्गमित केला आहे. सध्या राकेश जनबंधु याच्या स्थानबद्धतेबाबत कायदेशीर कार्यवाही चालू आहे.
सदरची कारवाई श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा, श्री सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शनात श्री सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघात, पोहवा/१३०२ उमाकांत लडके, पोहवा/१४८८ रविंद्र घाटुले, पोहवा /१२२५ संतोष वाघमारे, पोअं/९३२ अनंत हराळ, पोअं/१६८३ भारत बुटलेकर, पोअं/१७०४ दिपक मस्के सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यालय हिंगणघाट यांनी केली आहे.


