तब्बल २३ वर्षांनी फुलली जुन्या मैत्रांची शाळा
२००३ बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना :_ तालुक्यातील कुरई येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या २००३ च्या बॅचचा स्नेहमेळावा तब्बल २३ वर्षांनी अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. दीर्घ काळानंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत शालेय जीवनातील क्षण पुन्हा एकदा अनुभवले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक होते. यावेळी उपाध्ये, खोले, मोहितकर, दडांचे, कुमरे, कांबळे, ठाकरे, रोगे तसेच अंगणवाडी सेविका पोतराजे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आपापल्या आयुष्यातील प्रवास, यश-अपयश आणि अनुभव शेअर केले. अनेकांनी शालेय आठवणी सांगताना भावुक होत जुने दिवस आठवले. या स्नेहमेळाव्यामुळे पुन्हा एकदा मैत्रीचे बंध दृढ झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता बोबडे, आरिफ शेख, प्रदीप कौरासे, अरविंद राजूरकर, पवन कोवे, रवींद्र देवाळकर, दिनेश जुनगरी, दिनेश कुडमेथे, गणेश धांडे, देवानंद आसुटकर, प्रकाश बोर्डे, मीननाथ काकडे, गणेश मोहितकर, जितू डोहे, दिनेश पिंपळकर, विजय हिरादिवे, खंडू आगलावे, प्रवीण गोहने तसेच प्रतिभा येरगुडे, सरिता पोतराजे, संगीता खीरटकर, नंदा दुधलकर, मंगला निब्रड, संगीता उरकुडे, गीता वांढरे, सविता हेपट, सपना कौरासे, वंदना मते, शायना पठाण, गीता मुसळे आदींनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचा समारोप आनंददायी वातावरणात झाला असून, पुढील काळातही अशा स्नेहमेळाव्यांचे आयोजन करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.



