अवैद्य दारू वाहतुकीवर सावंगी मेघे पोलीसांची धडक कार्यवाही
1 लाख 24 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पो स्टे सावंगी मेघे येथील पोलीसांची धडक कार्यवाही सावंगी (मेघे) पोलीस हे पो स्टे परीसरात पेट्रोलींग करीत असताना मुखबीरकडुन खात्रीशीर खबर प्राप्त झाली की सालोड हीरापुर ता जी वर्धा येथे राहणारा प्रणय विशाल सुटे हा आपले काळ्या कलरचे बजाज कंपनीच्या चेतक ईलेक्ट्रीक गाडीचे डीक्कीत विना पास परवाना देशी व विदेशी दारुचा माल घेवुन सावंगी मेघे वर्धा ते पालोती रोडने हार्टेल शाही दावतजवळ रोडने जाणार आहे. अशा खबरेवरून आम्ही पंच व पो स्टॉफसह त्याचेवर प्रोरेड कारवाई करणे कामी खाजगी वाहणाने रवाना झालो पंच व पो स्टॉफसह मेघदुत अपार्टमेंट चे समोर पालोती रोड सावंगी (मेघे) रोडवर नाकेबंदी करून थांबलो असता शाही दावत हॉटेलजवळ मेघदुत अपार्टमेंट चे समोर खबरेप्रमाणे पो स्टॉफ व पंचासह नाकेबंदी केली असता एक ईसम हा काळ्या कलरचे बजाज चेतक ईलेक्ट्रीक गाडीने सावंगी मेघे ते पालोती रोडने हॉटेल शाही दावत या हॉटेलकडे सावंगी चौकाकडुन येताना दीसला त्यास पंच व पो स्टॉफचे मदतीने थांबवुन त्यास त्याचे नाव पत्ता वीचारले असता त्याने त्याचे नाव प्रणय विशाल सुटे वय 24 वर्ष रा.सालोड (हीरापुर) ता जी वर्धा असे सांगीतले वरुन पंचासमक्ष त्याला त्याची डीक्की खोलण्यास सांगीतले असता त्याचे ताब्यातील काळ्या कलरचे बजाज चेतक ईलेक्ट्रीक गाडी क्रमांक एम एच 12 यु एच 4261 चे डीवीत काळ्या कलरचे बॅगमध्ये 1)) विदेशी दारुने भरलेल्या रॉयल ग्रीन कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल. च्या 03 शिश्या प्रती शिशी 400 रू. प्रमाणे 1200/- रू. चा माल 2) विदेशी दारुने भरलेल्या ऑल सीजन कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल. च्या 04 शिश्या प्रती शिशी 400 रू. प्रमाणे 1600/- रू. चा माल 3) विदेशी दारुने भरलेल्या बी सेवन कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल. च्या 03 शिश्या प्रती शिशी 400 रू. प्रमाणे 1200/- रू. चा माल मिळुन आला त्यास पास परवाना बाबद विचारले असता त्याने पास परवाना नसल्याचे सांगीतले व गाडीचे कागदपत्र व लायसन्स बाबद विचारले असता गाडीचे कागदपत्र व लायसन्स नसल्याचे सांगीतले वरुन 4) जुनी वापरती काळ्या कलरची बजाज कंपनीची चेतक ईलेक्ट्रीक गाडी क्रमांक एम एच 12 यु एच 4261 कींमत 120000/- रुपये असा एकुन जु.की. 124000/-रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून नमुद आरोपी प्रणय विशाल सुटे वय 24 वर्ष रा.सालोड (हीरापुर) ता.जी. वर्धा विरूध्द लेखी फिर्याद वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोहवा अभय खोब्रागडे ब.नं 274, पोशी शाम सलामे ब.नं 1654, पोशी गौरव नरताम ब न 681 सर्व नेमुणकीस पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली आहे.



