ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बायगाव बु. येथील जबरी चोरीचा उलगडा; तिघे गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त

अंढेरा पोलिसांची धडक कारवाई : गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केली अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : बायगाव बु येथे झालेल्या जबरी चोरीचा उलगडा करण्यात अंढेरा पोलिसांना यश आले आहे. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तिन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पाच लाख 38 हजार रुपयांचा एवज जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोरट्यांना अटक केल्याने अन्य चोरीचे गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बायगाव बु येथे चोरट्यांनी जबरी चोरी करीत लाखो रुपयांचे दागिणे लंपास केले होते. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. गोपीनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अंढेरा पोलिसांनी रवी प्रदीप पवार (वय २१, रा. मोटेगाव, ता. रिसोड, जि. वाशिम), निलेश (ईलेश) जगन शिंदे (वय २५, रा. धानोरी, ता. चिखली, जि. बुलडाणा), उमेश जगन शिंदे (वय २३, रा. धानोरी, ता. चिखली, जि. बुलडाणा) यांना अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने – ७७ ग्रॅम (किंमत सुमारे ४,७७,००० रुपये), चांदीचे दागिने – ८० ग्रॅम (किंमत सुमारे १०,४०० रुपये), रोख रक्कम – ५१,००० रुपये असा ५,३८,४०० रुपयांचा एवज जप्त करण्यात आला आहे. चोरी गेलेल्या दागिण्यांपैकी सोन्याची लगडी – ७८.५७० ग्रॅम (किंमत सुमारे ४,७७,००० रुपये) व दुचाकी (MH ३७ Y ९३४७) – अंदाजे ३५,००० रुपये पोलिसांनी जप्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे (ठाणेदार, अंढेरा) यांच्या नेतृत्वात अंढेरा पोलिसांनी केली. पुढील तपास अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक दिनेश घुगे करीत आहेत. चोरट्यांना अटक केल्यामुळे अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गंत चोरीच्या इतर घटनांचाही उलगडा होणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये