अवैध गावठी दारू वाहतूक प्रकरणी एकाला अटक
सांवगी मेघे पोलिसांची कारवाई..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सांवगी मेघे पोलिसांनी अवैध गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीवर कारवाई करत त्याला अटक केली आहे. ही कारवाई १९ जानेवारी २०२६ रोजी सांवगी मेघे पोलिस स्टेशन हद्दीत करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार सांवगी मेघे परिसरात पोलिस स्टाफ गस्त घालत असताना पांढरकवडा परिसरातील बेंडा येथे राहणारा आरोपी रंजीत अविनाश पवार हा निळ्या रंगाच्या सुझुकी बर्गमॅन मोटारसायकलने गावठी दारूची अवैध वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सावंगी मेघे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
तपासणीदरम्यान आरोपीकडून १० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. या दारूची किंमत सुमारे २,००० रुपये असून मोटारसायकलसह एकूण सुमारे १,०२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा क्रमांक २०९/२०२५ अन्वये कलम ६५ (अ), तसेच इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलिस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे, पोलिस उपनिरीक्षक विलास भेंडे, हेड कॉन्स्टेबल संजय पवार, अनिल वेदपाठक, हरिषचंद्र राठोड व अमोल जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.
पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई करीत आहेत.



