“गांजा अंमली पदार्थाची विक्री करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 19 एप्रिल 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथक पोलीस स्टेशन समुद्रपुर परीसरात हजर असतांना, मुखबीरतर्फे मिळालेल्या खात्रीशीर खबरेवरून मौजा कानकाटी चौक, राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर तह. समुद्रपुर येथे अॅटो क्र. एम.एच.49 सि.एफ. 3611 यावर सापळा रचुन एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, आरोपी नामे 1) शेख अलीम शेख रमजान, वय 62 वर्ष, रा. बडा ताज बाग जवळ आदर्श नगर नागपुर 2) सत्तार खान गौस खान, वय 57 वर्ष, रा. भोसले वाडी पाचपावली नागपुर हे दोघेही संगणमताने त्यांचेजवळील प्रवासी अॅटोने गांजा अंमली पदार्थांची विक्री करीता वाहतुक करतांना मोक्कावर रंगेहाथ मिळुन आल्याने. जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीतांचे ताब्यातुन निव्वळ 02 किलो 101 ग्रॅम गांजा अमली पदार्थ, अॅटो व मोबाईलसह जु.कि. 4,12,525 रू चा मुद्देमाल जप्त करून, दोन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. समुद्रपुर येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. प्रकाश लसुंते, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अक्षय राउत, दिनेश बोथकर, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.



