उत्स्फूर्त प्रतिसादात जिवती येथे पेंशन महामेळावा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा जीवतीच्या* वतीने व दिपक गोतावळे तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ महाविद्यालय जिवती येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या पेन्शन मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून
मा श्री विपिन धाबेकर (जिल्हाध्यक्ष),
मा लक्ष्मीनारायण दोडके (गटविकास अधिकारी),
सत्कार मूर्ती मा श्री संदीप चौधरी(गटशिक्षणाधिकारी),
प्रमुख मार्गदर्शक म्हणून लखन साखरे (जिल्हा सचिव ),
रवींद्र मते (कार्याध्यक्ष),
निलेश कुमरे (जिल्हा नेते),
निळकंठ खरबे (जिल्हा प्रमुख),
पंकज उद्धरवार
(तालुका सचिव चंद्रपूर),
उमेश आडे (तालुकाध्यक्ष कोरपना),
मंगेश साखरकर सर IT,
अमर पेंढारकर सर IT,
अतुल घोडमारे
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सर्व केंद्रप्रमुख, सर्व शिक्षक संघटनांचे अध्यक्ष/ सचिव हे उपस्थित होते।
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक गोतावळे (तालुकाध्यक्ष ) यांनी केले तर उद्घाटकीय मनोगत
मा लक्ष्मीनारायण दोडके (गविअ) यांनी एन पी एस जुनी पेन्शन व शेअर मार्केट याबद्दल आपल्या नेहमीच्या हसतमुख वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केले । तसेच कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती संदीप चौधरी (गशिअ) यांनी पेन्शन संघटनेची सुरुवात ते पेन्शन संघटनेतर्फे आज पर्यंत झालेले सर्व आंदोलनाची माहिती सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांना दिली| त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक लखन साखरे यांनी उपस्थित शिलेदारांना डीसीपीएस ते एनपीएस चा प्रवास ,विकल्प याबद्दल सविस्तर विवेचन केले। निलेश कुमरे , पंकज उद्दरवार ,उमेश आडे , रूपा मिश्रा यांनी आपापले मनोगत व्यक्त केले। शेवटी विपिन धाबेकर(जिल्हाध्यक्ष) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सर्व पेन्शन शिलेदारांना पुन्हा एकदा बूस्ट देण्याचे काम केले व येणाऱ्या काळात आपल्याला पुनश्च एकदा आंदोलन, मोर्चे यासाठी तयार राहावे लागेल व संघटनेमध्ये तन-मन धनाने कार्य करावे लागेल असे आवर्जून सांगितले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन
भूषण राऊत यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन सुभाष बोबडे यांनी केले। या कार्यक्रमाला संपूर्ण तालुक्यातून प्रचंड प्रतिसादात सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते। याच मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला। सर्व पदांची बिनविरोध निवड झाली हे या कार्यकारणी विस्तारातील महत्त्वाची बाब होती। सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे हा पेन्शन मेळावा खऱ्या अर्थाने सम्पूर्ण महाराष्ट्राला बुस्ट देणारा महामेळावा ठरला। सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिवती तालुक्यातील सर्व विभागातील शिलेदारांनी अथक परिश्रम घेतले।



