ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तोहोगांवात महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

आमदार देवराव भोंगळेंची उपस्थिती ; नवीन पशुवैद्यकीय इमारतीचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

 गोंडपिपरी तहसील अंतर्गत तोहोगांव येथे आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” जनसागराच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. या शिबिराला आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे शिबिराला अभूतपूर्व यश मिळाले.

शिबिरामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, शेतकरी आत्महत्या धनादेश वितरण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान, DBT योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व इतर यंत्र वाटप, सात_बारा उताराचे त्वरित वितरण, जमिनीचे वर्ग २ मधून १ मध्ये रूपांतरण आदेश, आधार कार्ड अद्ययावत, रेशन कार्ड दुरुस्ती व नवीन रेशन कार्ड वाटप, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, अँग्रीस्टॅक नोंदणी, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी आदेश, स्वामित्व कार्ड अशा विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे तत्काळ मार्गी लागली.

यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी शिबिराला भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला. “शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे हीच खरी लोकसेवा आहे,” असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या कामकाजाचे कौतुक केले. तसेच अशा शिबिरांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिबिरात महिला व बालविकास विभागामार्फत स्तनदा मातांना बेबी किटचे वाटप करण्यात आले, तर पंचायत समिती, कृषी विभाग, महावितरण आदी विविध विभागांनी आपापल्या योजनांची माहिती देत प्रत्यक्ष लाभ दिला. तहसील प्रशासन, पंचायत समिती अधिकारी, महावितरणचे अधिकारी, तसेच विविध विभागांचे कर्मचारी यांनी समन्वयाने काम करत शिबिर यशस्वी केले.

उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी, तहसीलदार शुभम बहाकर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या कार्यक्रमात गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, आरोग्य अधिकारी यांसह इतर सर्व तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शिस्तबद्ध नियोजन आणि तत्पर सेवा यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये