अनोळखी इसम मृत बेवारस अवस्थेत
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
अनोळखी ईसम वय अंदाजे 60 ते 65 वयोगटातील हा मृत अवस्थेत जानकी मेडिकल समोरिल वसंत टॉकीज कडे जाणारे रोडवर दि 13/04/2026 रोजी चे रात्री 07/00 वा दरम्यान मृत अवस्थेत बेवारस फिर्यादीचे दुकानचे बाजुला पडुन असतांना फिर्यादी श्रीनिवास विजय मोहता वय 33 वर्ष रा. मार्केट लाईन वर्धा यांनी पोलीस स्टेशनला येवुन तोंडी रिपोर्ट दिल्याने पो स्टे वर्धा शहर येथे मर्ग क्र.25/26 कलम 194 बि.एन.एस.एस प्रमाणे मर्ग नोंद करुन तपासात घेतला.
मृतकाचे वर्णन-वर्णन-लिंग पुरुष, वय अंदाजे 60 ते 65 वयोगटातील, उंची 5 फुट 2 इंच, रंग सावळा बांधा सडपातळ, चेहरा लांबट दात अपूर्ण, डोक्याचे केस पांढरे वाढलेले दाडीचे व मिशीचे पांढरे, वाढलेले दोन्ही हातावर शंकरजी व ओम गोंदलेले गळ्यात काळ्या पांढऱ्या मन्याची माळ, आंगात पांढऱ्या रंगाचे मळकट फुल बायचे शेर्ट व पांढऱ्या मळकट पायजामा घातलेला दिसत आहे



