ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वरसम्राज्ञी आशाताई भोसलेंच्या निधनामुळे देशाचा मधुर सूर हरपला

संगीत क्षेत्राची अपरिमित हानी - हंसराज अहीर

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : देशातील कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या महान पार्श्वगायिका आशाताई भोसले जी यांच्या दुःखद निधनाने देशाचा मधुर सूर हरपला आहे. एवढेच नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक ठेव्याची विषेशतः संगीत, कला, चित्रपट या क्षेत्राची अपरिमित हानी झाली असल्याची शोकसंवेदना पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केली आहे.

            पद्मविभुषण पुरस्कार प्राप्त या स्वरसम्राज्ञीने गेली अनेक दशके चित्रपटसृष्टीची अभंगपणे सेवा केली आहे. स्व. लतादिदिंच्या पाऊलावर पाऊल ठेवत आशाजींनी संगीत क्षेत्रात आपली विशेष ओळख प्रस्थापित केली होती. त्यांनी हिंदी, मराठी, बांगला व अन्य भाषेतील चित्रपटगीतेच गायली नाहीत तर, अभंग, ओव्या, भजन, भक्तीगीते, भुपाळ्या, पाॅपगीते गाऊन रसिकांना संगीताच्या अमृत वर्षावाने न्हावून टाकले होते. अशा महान भारतीय सुपुत्रीच्या निधनाने संगीत क्षेत्र पोरके झाले असल्याचेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

            या निधनाबद्दल अतिव दुःख व्यक्त करून त्यांनी आशाताईंना भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये