ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतीक अमंली पदार्थ विरोधी दिनाच्या दिवशी वर्धा उपविभागीय पोलीस पथक यांनी आरोपी कडुन 3,11,000/- रू चा अंमली पदार्थ गांजा पकडला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 26.06.2024 रोजी जागतीक अमंली पदार्थ विरोधी दिनाच्या जनजागृती करीत असतांना सांयकाळी उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांनी गोपनिय माहीती मिळाली वरून सदरची माहीती वरीष्ठांना देवुन सदर कार्यवाही करीता सावजी नगर, कारला, वर्धा येथे माहीती प्रमाणे आरोपी हा त्याचे दुचाकी मोपेडवर काळया रंगाची बॅग पायदानावर घेवुन येतानी दिसला वरून आरोपीवर नाकेबंदी करून रेड केला आरोपी नामे 1) नयन दत्ताजी कडु वय 26 वर्ष रा. सहयोग कॉलोनी कारला रोड पिपरी मेघे, वर्धा यांचे ताब्यातुन 1) अंमली पदार्थ ओलसर गांजा एकुन 10 की. ग्रॅम प्रती की 20,000/- रू प्रमाणे 2,00,000/- 2) एक सुजुकी ऐसेस कंपनीची निळ्या रंगाची मोपेड गाडी एम. एच 32 ऐ.व्ही 2899 कि. 1,00,000/- रू ३) गोल्डन रंगाचा कि पॅड वाला साधा केचोडा मोबाईल कि. 1000/- रू 4) एक ओप्पो कपंनीचा निळसर रंगाचा ॲन्डराईड मोबाईल कि. 10,000/- रू असा एकुन जु.की. 3,11,000/-रू चा माल मिळुन आल्याने नमुद आरोपीस सदर मिळुन आलेल्या अंमली पदार्थ गांजा बाबत विचारपुस केली असता त्यांनी गांजा हा सम्यक उर्फ अंकित अरून धवने रा. अवचित बाबा मंदीर जवळ, पिपरी मेघे ता.जि. वर्धा यांने आणुन दिल्याचे सांगीतले त्या वरून नमुद आरोपी याचा सुध्दा सदर गुन्हयात सहभाग दिसुन येत असल्याने आरोपीवर कठोर कार्यवाही करण्यात आली आहे तसेच आरोपी क्र 1 यांचेवर यापुर्वी सुध्दा बरेच गुन्हे नोंद आहे.

पोलीस स्टेशन सांवगी मेघे येथे आरोपीतांविरूध्द 1) अपराध क्रमांक 435/2024 कलम 20, 22 अंमली औषधीद्रव्ये व मनाप्रभावी पदार्थ अधिनियम 1985 (एनडीपिएस) अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो. स्टे. सावंगी मेघे येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री. प्रमोद के. मकेश्वर सा. यांचे सुचनेप्रमाणे पो.नि. पराग पोटे ठाणेदार वर्धा शहर, स.पो.नि संदीप कापडे, पो.उप.नि. परवेज खॉन, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पोलीस कर्मचारी मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, तसेच पोलीस स्टेशन सांवगी मेघे येथील पोलीस हवालदार सतीष दरवरे, प्रविण बोबडे, निलेश सडमाके, अनिल वैद्य, पो.अ. निखील फुटाने यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये