ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे काँग्रेस पक्षाचे संघटन सृजल अभियान राबविण्यात आले 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या सूचनेनुसारअखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेले जिल्हा समन्वयक मा..श्री अब्दुलजी हन्नान , तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेले सह समन्वयक मा.वीरेंद्रजी जगताप , प्रदेश सचिव ऐश्वर्याताई राठोड ,जिल्हा अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या प्रमुख प्रमुख उपस्थिती मध्ये, देऊळगाव राजा ब्लाँक मध्ये संघटन सृजन अभियान नियोजन बैठक, आज दि. ५ एप्रिल रोजी दु १ वाजता देउळगाव राजा येथील विश्रामगृह येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आली , देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यातील व शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी नेतेमंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी निष्ठावान काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते यांनी नेतृत्व करावे, असे आवाहन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले. जिल्हा अध्यक्ष पदी कुणाची निवड करण्यात यावी यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांचे मत पक्ष निरीक्षक अब्दुल हन्नान यांनी जाणून घेतले.

बैठकीला काँग्रेसचे नेते रमेश दादा कायंदे, देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष रामदास डोईफोडे, सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष सुनील जायभाये , माजी नगरसेवक हनीफ शहा, धोंडीराम लंके, समाधान पाबळे, रवी इंगळे, प्रा अशोक डोईफोडे, डॉ अरुण डोईफोडे,सदानंद वाघमारे, आयुब भाई , मुबारक खान, मतीन चाऊस, रामेश्वर वायाळ , गणेश आडे, गजानन डोईफोडे, शेख कदीर , शेख बशारत , शेख अनिस, अमित जाधव, रशीद टेलर तथा इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये