ब्रम्हपुरीच्या संगीत शिक्षिका मेघा करकाडे यांनी रचला इतिहास
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- उपराजधानी नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित संगीत कार्यक्रमात श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयातील संगीत विभाग प्रमुख प्रा. दीपश्री पाटील व त्यांच्या आजी – माजी अशा एकूण 40 विद्यार्थिनींचा सहभाग होता. भारतीय शास्त्रीय संगीतातील एकूण 36 रागांवर आधारित प्रा. दीपश्री पाटील रचित 81 बंदिशिंचं सलग 2 तास सादरीकरण करण्यात आलं.
या सादरीकरणाची नोंद इंडिया बुक तथा आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली. आपल्या चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे ब्रम्हपुरी येथील स्टेम पोदार लर्न स्कुल तथा नादब्रह्म संगीत विद्यालयातील संगीत शिक्षिका सौ. मेघा दुर्वास करकाडे यांचा या सादरीकरणात प्रामुख्याने सहभाग होता. त्यांनी हा रेकॉर्ड आपल्या नावावर केल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.



