ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दीनदयाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची वार्षिक आढावा बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित दीनदयाल विद्यालय व कनिष्ठ कला आणि विज्ञान महाविद्यालयाची शैक्षणिक सत्र २०२५-२६ ची वार्षिक आढावा बैठक शनिवार दि.०४ एप्रिल रोजी संपन्न झाली.

       बदलत्या काळानुरूप शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांचा संख्यात्मक आणि गुणात्मक विकास व्हावा या उद्देशाने चालू शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रम, जयंती, पुण्यतिथी, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, प्रशासन, व्यवस्थापन इत्यादी बाबीचा, संस्थेचे सचिव श्री.प्रेमराजसेठ भाला यांनी एकत्रितपणे आढावा घेऊन पुढील शैक्षणिक सत्राच्या अनुषंगाने सविस्तरपणे मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणादरम्यान श्री अशोकभाऊ कोटेचा यांनी, शिक्षकांनी आपली कार्ये अधिक निष्ठापूर्वक आणि समर्पित भावनेने पूर्ण करावीत असे प्रतिपादन केले.

         या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री अशोकभाऊ कोटेच्या, संचालक श्री अरविंदभाऊ शिंगणे, श्री बाबासाहेब मिनासे, श्री सहदेवराव सुरडकर, श्री सुनीलजी लाहोटी, श्री सुहासजी जामदार, श्री भूषणजी डागा, श्री गोपालजी बोरा, व स्थानिक सल्लागार श्री त्र्यंबकराव जायभाये, श्री भगवानराव कायंदे, श्री देवीदासजी बोबडे, श्री धर्मराजजी हनुमंते, माजी पर्यवेक्षक श्री शैलेंद्रजी व्यास व रमेशजी डोईफोडे, माजी प्राचार्य व निरीक्षक श्री सुभाष फटींग सर, श्री शंकरराव भालेराव सर, प्राचार्य श्री बी.एन. आरसोडे, पर्यवेक्षक श्री राजेशजी भिवटे व कार्यालयीन प्रमुख श्री आदिनाथ कमळसकर आदी उपस्थित होते

     तसेच या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी सर्व शिक्षक – शिक्षिका, प्राध्यापक – प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाली, या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पल्लवी सोनूने मॅडम यांनी केले तर, प्रास्ताविक भाषण प्राचार्य श्री बी.एन.आरसोडे सर यांनी केले आणि पर्यवेक्षक श्री. राजेशजी भिवटे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. शांती मंत्राने बैठकीचा समारोप झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये