ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तहसिलदार यांच्यामुळे कर्मचा-यांना होणा-या मानसिक त्रासाबाबत निवेदन

अर्जदार तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी बंधु

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

मा. महोदय, आमच्या कार्यालयातील विभाग प्रमुख तहसिलदार श्री. राजेश भांडारकर यांच्या वर्तणुकीमुळे कर्मचा-यांमध्ये मानसिक तण्णूव व अस्वस्थता निर्माण झालेली आहे. तहसिलदार हे कोणत्याही कारणाशिवाय ओरडणे, धमकावणे, व मानसिक त्रास देणे, तसेच प्रकरणात योग्य मार्गदर्शन न देता कामावावत दोषारोप करणे, तसेच अर्धन्यायीक प्रकरणे चालवितांना कोणताही एक किंवा दोन दिवस देणे अपेक्षीत असतांना प्रकरणात कोणतीही कार्यवाही नियमानुसार न करता वारंवार नागरीकांसमोर अवाच्छ भाषेत बोलणे यामुळे कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. व कर्मचा-यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. दिनांक 30.03.2026 रोजी अशाचप्रकारे अर्धन्यायीक प्रकरणाची सद्यस्थिती ही प्रलंबित होती. व सदर नागरीकांनी कर्मचा-याविरोधात अनावश्यक आरोप केले परंतु सदर प्रकरणात कोणताही निर्णय तहसिलदार यांनी घेतलेला नाही. प्रकरण तहसिलदार समोर ठेवल्यानंतर वकोलांचा सल्ला घेवू अशा शब्दात बोलून वेळ काढून घेण्यात येते.

परंतु प्रकरणात मार्गदर्शन करीत नाही. प्रकरणे चालविण्याचे दिवस नेमून दिले नसल्यामुळे तहसिल कार्यालयात येणारा नागरीक कोणत्याही दिवशी येतो व नागरीक उपस्थित झाल्यानंतर प्रकरणे तहसिलदार यांचे समक्ष ठेवल्यानंतर प्रकरणात निर्णय घेत नसल्यामुळे थातुर-मातुर वेळ काढून घेण्यात येते यामुळे प्रकरणे प्रलंबित राहतात. तसेच तहसिल कार्यालयात येणा-या प्रत्येक नागरीकाला व येणा-या राजकीय प्रतिनिधीला तसेच पत्रकाराला माझ्या टेबलवर एकही फाईल प्रलंबित राहात नाही अशा प्रकारे भाष्य करीत असतो. तसेच अर्धन्यायीक प्रकरणात परिपुर्ण कामकाज झाल्यानंतर आदेशास प्रकरणे ठेवल्यानंतर सदर आदेश करण्यास टाळाटाळ करतो. तसेच एकाच प्रकरणात नागरीक चकरा मारत असल्यामुळे तो कर्मचा-यावर स्वतःचा रोष व्यक्त करतो. व नाहक शिवीगाळ करतो.

यामुळे अनेक अर्धन्यायीक प्रकरणे तहसिल कार्यालयात प्रलंबित राहतात. व सदर प्रकरणात निर्णय घेतांना कर्मचा-याला अडचण निर्माण होत आहे. यापुर्वी मा.श्री. बालाजी कदम परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी तथा तहसिलदार भद्रावती व श्री. संदीप पानमंद तहसिलदार भद्रावती यांचे कार्यकाळात कोणताही व्यक्ती धमकी देत नव्हता व सुरळीतपणे अर्धन्यायीक प्रकरणाचे कामकाज सुरु होते. परंतु श्री.राजेश भांडारकर हे तहसिलदार भद्रावती पदावर रुजु झाल्यापासून नागरीकांच्या कामात व्यतय निर्माण झाली असून अनेक अर्धन्यायीक प्रकरणे निकाली काढणे शिल्लक आहे.

यास्तव नागरीकांचा रोष कर्मचा-यांवर येत असल्यामुळे व यावावत तहसिलदार ठोस निर्णय घेत नसल्यामुळे नागरीक कार्यालयात येवून आत्महत्येची धमकी देत आहे. त्यामुळे कर्मचारी विनाकारण दवावात येवून काम करीत आहे. तसेच कर्मचा-यांचे वारवांर टेवल बदलविणे हा प्रकार जास्त सुरु असल्यामुळे दोन महिन्यात चार महिन्यात असे वेळोवेळी टेबल बदलण्याचे प्रकार होत असल्यामुळे काम्प्रत दिरंगाई होत चाललेली आहे. आज दिनांक 31.03.2026 रोजी तहसिलदार यांचे वाहन चालक यांचे अतिकालीक भत्ता देयक सही न करता अनुदान शासनाला परत केले व आस्थापनाचे संबधीत कर्मचारी व वाहनचालक यांचेवर एफआयआर दाखल करतो अशा शब्दात बोलत होते. वाहन चालक हा गौण खनिज पथकासोबत रोज रात्रो फिरत असतो. व दिवसा कार्यालयीन वेळेत हजर असतो तरी सुध्दा त्याला शासन वित्त विभागाचे दिनांक 7 ऑगस्ट, 2023 चे शासन निर्णयानुसार अतिकालीक भत्ता न देता त्याला शिवीगाळ करुन बिल परत केले. तसेच पुरवठा विभागात डिडिओ एक असतांना सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये शिधापत्रीका संगणकीकृत झालेली असून तसेच इतर कामात नेटवर्कची आवश्यकता असतांना वारंवार तोंडी सुचना तहसिलदार यांना दिल्यानंतर सदर कामाकडे दुर्लक्ष करीत असतात तसेच कोणतीही फाईल नेल्यानंतर सही न करता वारंवार टाळाटाळ करुन शासकीय कामात दिरंगाई करीत असतो. त्यामुळे पुरवठा विभागात काम करतांना दिरंगाई व व्यत्यय निर्माण होत आहे. व लोकांची कामे होत नसल्यामुळे नागरीक नाहक शिवीगाळ करुन अवाच्छ भाषेत बोलून जातो. त्यामुळे तहसिल कार्यालयात काम करतांना मनात भय ठेवून काम करावे लागत आहे. कारण कोणत्याही दिवशी तहसिल कार्यालयात कोणताही अनुचीत प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी आमची सर्व कर्मचा-यांची विनंती आहे की, श्री. राजेश भांडारकर तहसिलदार यांची तात्काळ वदली करण्यात यावी. अन्यथा तहसिल कार्यालयातील कर्मचा-यांकडून लेखनी बंद आंदोलन करण्यात येईल. यास्तव तहसिल कार्यालयातील कर्मचारी तहसिलदार विरोधात निषेध नोंदवित आहे.

प्रतिलिपी :

(1) मा.ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे महसुल मंत्री महोदय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना माहीतीस सादर.

(2) मा.ना.श्री. अशोक उईके आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा यांचे स्विय सहाय्यक स्थित चंद्रपुर नियोजन भवन चंद्रपुर यांना माहीतीस सविनय सादर.

(3) मा. श्रीमती प्रतिभाताई धानोरकर खासदार महोदय स्थित कार्यालय वरोरा यांना माहीतीस सादर.

(4) मा. श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार आमदार महोदय बल्लारपूर विधानसभा मतदार संघ यांना माहीतीस सादर.

(5) मा. श्री. करणजी देवतळे आमदार महोदय वरोरा-भद्रावती विधानसभा मतदार संघ स्थित वरोरा कार्यालय यांना माहीतीस सादर.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये