ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय अनुसूचित जाती – जनजाती विकास परिषदच्या जिल्हाध्यक्षपदी सौदागर लाटकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती विकास परिषद, नवी दिल्ली यांच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी सौदागर श्याम लाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेतर्फे जारी करण्यात आलेल्या अधिकृत नियुक्तीपत्रानुसार त्यांना सामाजिक कार्याचा अनुभव, समाजातील सक्रिय सहभाग आणि आदिवासी-मागासवर्गीय समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सौदागर श्याम लाटकर हे दीर्घकाळापासून अनुसूचित जाती-जनजाती समाजाच्या प्रश्नांवर काम करत असून समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी, मागासवर्गीय आणि वंचित समाजाच्या प्रश्नांना अधिक बळकटी मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सौदागर लाटकर यांनी आपल्या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, समाजातील शिक्षण, कौशल्य विकास आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील पात्र घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनात्मक स्तरावर काम केले जाईल. तसेच समाजातील तरुणांना मार्गदर्शन करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण मांगरिया, केंद्रीय मंत्री ज्युएल उराव, माजी केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, राष्ट्रीय सघटक प्रभारी पी. सी. बेरवाल, राष्ट्रीय महासचिव डॉ. देवराव होळी, राज्य अध्यक्ष रवि सोमकुवर, महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. नरेंद्र उंदीरवाडे आणि महिला मोर्चा प्रदेश महामंत्री ऍड.कल्पना मोहकर यांनी लाटकर यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळात समाजाच्या विकासासाठी प्रभावी काम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये