कौटुंबिक संशयातून एका विवाहित महिलेची गळा दाबून हत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
शहरातील राणी लक्ष्मी वॉर्ड परिसरात कौटुंबिक संशयातून एका विवाहित महिलेचा गळा दाबून खून केल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. संतापाच्या भरात पतीने तिचा गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्चच्या रात्री ते २५ मार्चच्या पहाटे दरम्यान ही घटना घडली. पोलीस स्टेशन येथे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड कर्तव्यवर असताना यांना ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथून एका महिलेच्या मृत्यूबाबत माहिती प्राप्त झाली.
मृतक भाग्यलक्ष्मी ही मंचेरीयाल, तेलंगणा येथील असून तिचे अगोदर लग्न झाले होते. तिला ११ व ८ वर्षाचे दोन मुल आहेत. नंतर तिचे प्रेम संबंध १० वर्षाचे लहान असणारा आरोपी राजेश सोबत झाले होते. ते मंचेरीयाल येथून पळून येऊन बल्लारपूर येथे पती पत्नी म्हणून राहत होते.



