ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     शहरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. सकाळी ९ वाजता विविध ईदगाहांमध्ये नमाज अदा करण्यात आली. शहरातील मुख्य ईदगाहसह सुमठाणा येथील ईदगाह, गरीब नवाज मस्जिद, मदिना मस्जिद, डोलारा तलाव परिसरातील मस्जिद, मस्जिद अक्सा येथे मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते.

जामा मस्जिदचे इमाम हाफिज गफार अन्सारी, गरीब नवाज मस्जिदचे इमाम हाफिज मुजम्मिल, सुमठाणा आयुध निर्माणी येथील ईदगाहमध्ये हाफिज कौनेन रजा, तसेच मदिना मस्जिदचे इमाम फारुख यांनी नमाज अदा करून घेतली. यावेळी सर्वांनी देशात शांतता, ऐक्य व सदभावना नांदो यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली.

नमाजा नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. शहरात ईद सणानिमित्त आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या प्रसंगी जामा मस्जिदचे अध्यक्ष हाजी बबन सेठ, कार्याध्यक्ष हाजी जावेद सेठ, गरीब नवाज मस्जिदचे अध्यक्ष डॉ. शकील, रब्बानी शेख, पत्रकार जावेद शेख, मुनाज शेख, सिकंदर शेख, हाजी जाकीर शेख, शहीद शेख, हाजी अब्बास हुसेन, नगरसेवक फैयाज शेख, जनसेवक इम्रान खान आदींसह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये