ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरोडा येथील पोलिस पाटलाची हकालपट्टी करा

५ ब्रास रेती साठवणूक व वीट भट्टी प्रकरण भोवणार     

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शासनाची फसवणूक 42000 हजार रुपयाचा दंड 

दंड व शास्तीचे प्रकरणाचे दस्ताऐवज तहसील कार्यालयातुन गहाळ

 आदिवासी कोलाम समाजाची जमीन केली बंजर

राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या वरोडा येथील पोलिस पाटील खुशाब मुरलीधर पोडे यांना अवैध गौण खनिज साठवणूक आणि वीटभट्टी प्रकरणात तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष उमेश राजुरकर तसेच गावातील नागरिकांनी यासंदर्भात तहसीलदार व उपविभागीय अधिकारी, राजुरा यांना निवेदन दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजा वरोडा येथील शेत सर्वे क्रमांक 110 वर पोलिस पाटील खुशाब पोडे यांनी पत्नीच्या नावाने कोणतीही शासकीय परवानगी न घेता वीटभट्टी सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वीटभट्ट्यांमधून मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन करून दररोज हजारो विटांचे उत्पादन केले जात असून त्यांची अवैध विक्रीही सुरू असल्याचे सांगितले जाते. या प्रक्रियेत शासनाला देय असलेला गौण खनिज महसूल (रॉयल्टी) भरला जात नसल्याने शासनाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

याशिवाय संबंधित शेतामध्ये सुमारे ५ ब्रास रेतीची अवैध साठवणूक आढळून आली असून या प्रकरणी सुमारे ४२ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पोलिस पाटील या जबाबदारीच्या पदावर असताना स्वतःच बेकायदेशीर रेती साठवणूक व वीटभट्टी व्यवसाय चालवून पदाचा गैरवापर करून अवैध कामांना संरक्षण दिल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीकडूनच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने प्रशासनाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

तसेच शासनाने आदिवासी कोलाम जमातीला उदरनिर्वाहासाठी शेतीचे पट्टे वाटप केले असताना, मागील २५ ते ३० वर्षांपासून या जमिनींचा वीटभट्टी व्यवसायासाठी वापर करून त्या बंजर केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. तसेच

दंड व शास्तीचे प्रकरणाचे दस्ताऐवज राजुरा तहसील कार्यालयातुन गहाळ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित पोलिस पाटलावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष उमेश राजुरकर यांनी दिला आहे.

तहसीलदार राजुरा यांनी याबाबत वरोडा पोलिस पाटील खुशाब पोडे यांना नोटीस दिला असून दंड व शास्तीचे प्रकरणाचे दस्ताऐवज राजुरा तहसील कार्यालयातुन गहाळ प्रकरणाची चौकशी सुरू असून लवकरच कारवाई करण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी रवींद्रकुमार माने यांनी सांगितले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये