ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माणिकगढ सीमेंट वर्क्स, सी.एस.आर अंतर्गत हनुमान नगर, गडचांदूर येथे सी सी रोड चे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

माणिकगढ सिमेंट वर्क्स,सीएसआरच्या माध्यमातून आसपासच्या गांवात सतत विकास कामे होत आहे.

यावेळेस गडचांदूर नगरपरिषद च्या विनंती ला मान देत,अल्ट्राटेक माणिकगडचे युनिट हेड अतुल कन्सल व वरिष्ठ उपाध्यक्ष मुकेश गहलोत यांच्या मार्गदर्शनात,गडचांदूर येथील हनुमान नगर येथे एकूण 350 मीटर लांबीच्या सी सी रोड चे आज भूमिपूजन अल्ट्राटेक, माणिकगड सिमेंट चे ई आर हेड नवीन कौशिक व नगराध्यक्ष निलेश ताजने यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व कुदळ मारून करण्यात आलेत.

या कार्या वेळी गडचांदूर चे उपाध्यक्ष संजय मेंढी तसेच नगरसेवक व गडचांदूर मधील नागरिकांची उपस्थिती होती.

या रोड मुळे हनुमान नगर मधील नागरिकांना तसेच हनुमान मंदिरात जाणाऱ्या भक्ताना व शेतकऱ्यांना ये जा करण्यास सोईचे होईल असे मत उपस्थितानी व्यक्त केलीत.

या कर्याबद्दल नागरिकांनी अल्ट्राटेक, माणिकगड सिमेंट च्या सी एस आर चे आभार व्यक्त केलेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये