रासेयो स्वयंसेवकांची समाजहितासाठी उल्लेखनीय कामगिरी – डॉ.संदीप हाडोळे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित व श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचालित समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथील राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) अंतर्गत सात दिवसीय निवासी विशेष शिबिर उत्साहात संपन्न झाले. सावखेड भोई, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा येथे “शाश्वत विकास युवा : पाणलोट व्यवस्थापन, पडीत जमीन विकास, पर्यावरण संवर्धन, कृषी-पशु समृद्धी व आरोग्य शिबिर” या विषयावर विविध उपक्रम राबविण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव सतीश कांयदे यांच्या हस्ते झाले. त्यांनी सामुदायिक सेवेद्वारे देशसेवेची संधी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी एन.एस.एस. हे प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगून स्वयंसेवकांनी नेतृत्व कौशल्ये विकसित करावीत व सामाजिक जबाबदारीची जाणीव जोपासावी, असे आवाहन केले.प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी प्रास्ताविकात शिबिरातील उपक्रमांचे सविस्तर मार्गदर्शन केले. स्वयंसेवकांनी निस्वार्थ भावनेने राष्ट्रसेवा व समाजसेवा करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमास दादाराव मुसदवाले शिक्षणाधिकारी, संजय मुंदानकर, मुख्याध्यापक, जि. प. मराठी प्रा. शाळा सावखेड भोई, संतोष टेकाळे अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थ, कर्मचारीवृंद व स्वयंसेवक उपस्थित होते.
विद्यार्थी कल्याण अधिकारी व विद्यापीठ समन्वयक डॉ. संदीप हाडोळे यांनी शिबिरास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कार्याचे निरीक्षण करून मार्गदर्शन केले.
बौद्धिक सत्रामध्ये प्रा. मधुकर जाधव व्यंकटेश महाविद्यालय यांनी “विद्यार्थी जीवनातील संस्कारांचे महत्त्व”, सुरज गुप्ता यांनी “समाज परिवर्तनामध्ये युवकांचे योगदान”, तसेच शिवव्याख्याते अनंत देशमुख यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले.
दैनंदिन कार्यक्रमात योगासने, प्रार्थना, श्रमदान व प्रभात फेरीचा समावेश होता. सांस्कृतिक कार्यक्रमांत महिला सक्षमीकरण, शारीरिक-मानसिक आरोग्य, योगा, तसेच विद्यार्थ्यांच्या संभाषण कौशल्य व आत्मविश्वास वाढीसाठी नृत्य व भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रा. अश्विनी जाधव रा.से.यो. सहअधिकारी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित ठेवण्याचे कार्य केले.विशेष उपक्रम व आरोग्य शिबिरे
शिबिरादरम्यान शोषखड्डे निर्मिती, वृक्षलागवड, मोक्षधाम स्वच्छता, “पाणी अडवा पाणी जिरवा” अंतर्गत नदीवर बंधारा बांधणे, महिला सक्षमीकरण, मतदान जनजागृती, कृषी ज्ञानप्रसार रॅली व पथनाट्य आदी उपक्रम राबविण्यात आले.
आरोग्य जनजागृती अंतर्गत बाल आरोग्य व दंत तपासणीसाठी डॉ. आशुतोष सोळंकी, नेत्र तपासणीसाठी डॉ. कार्तिक कोल्हे, तसेच समर्थ स्कूल ऑफ नर्सिंग प्राचार्य
योगेश ताठे यांचे सहकार्य लाभले. जनावरांचे आरोग्य तपासणी, लसीकरण व गोठा व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. रक्तदान शिबिरासाठी प्रकाश भांगे, श्री स्वामी समर्थ ब्लड बँक, जालना यांचे सहकार्य लाभले.शेतकरी हितगुज उपक्रम
विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन मिरची, कांदा, कारले, टरबूज, खरबूज सीड प्लॉट, द्राक्ष व लिंबू बागांची पाहणी केली व आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती घेतली.समारोप सोहळा संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यांनी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांचे अनुभव व आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवावे, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संस्थेचे सहकार्य अविरत राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.असिस्टंट कमिशनर ॲनिमल हसबंडरी डॉ. भरत सांगळे, तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. पवार आणि करोके ग्रूप यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. योगेश चगदळे याचे नियोजन व परिश्रम, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. विकास म्हस्के शिस्त व नवोपक्रम स्वयंसेवकांना उपयुक्त ठरले.
तसेच प्रा. वैभव देशमुख, प्रा. अर्चना सानप, प्रा. सचिन सोळंकी, प्रा. अरुण शेळके, डॉ. उषा जायभाये, प्रा. किशोर कव्हर, प्रा. गणेश घुगे आदी प्राध्यापक, सय्यद असीम, संजय लाड, गबाजी लाड ,परमेश्वर मुख्यदल यांचे सहकार्य लाभले.या विशेष शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण व कृषीविषयक व्यावहारिक ज्ञान वृद्धिंगत झाले.



