ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे वर्धा येथे आगमन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी भारत देशाचे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे वर्धा सेवाग्राम येथे आगमन झाले असून त्यांचे स्वागत महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वान्मथी सी व मान्यवरांनी सेवाग्राम हेलिपॅड येथे आगमन प्रसंगी त्यांचे स्वागत केले.

माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेवाग्राम आश्रम, बापुकुटीला भेट दिली. आदी निवास, बा कुटी, बापुकुटी, बापुंचे कार्यालयाची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. प्रार्थना सभेत सहभाग घेतला व वृक्षारोपण केले. तसेच सूत कताई केली. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी व मान्यवर उपस्थित होते.

भारत देशाच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेवाग्राम आश्रम, बापुकुटीला दिली भेट 

वर्धा : दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी भारत देशाच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आगमन वर्धा जिल्हात झाले असून यावेळी भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आदी निवास, बापू कुटी, बापुकुटी, बापुंचे कार्यालयाची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. प्रार्थना सभेत सहभाग घेतला व वृक्षारोपण केले.

तसेच सूत कताई केली. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी व मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये