ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती येथे २ मार्च रोजी समाधान शिबीर व जनता दरबार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “समाधान शिबीर” अभियान टप्पा–१ अंतर्गत विशेष जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम दिनांक ०२ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता तहसील कार्यालय, जिवती येथे होणार आहे. या जनता दरबार जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली तसेच देवराव भोंगळे, आमदार, राजुरा विधानसभा मतदारसंघ यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.

      तालुक्यातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन नागरिकांच्या तक्रारी व मागण्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

लोकाभिमुख व लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी जनता दरबारात उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन तहसीलदार रूपाली मोगरकर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये